Jump to content

अँडी मरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲंडी मरे या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲंडी मरे
देश युनायटेड किंग्डम
वास्तव्य लंडन, यु.के.
जन्म १५ मे, १९८७ (1987-05-15) (वय: ३७)
ग्लासगो, स्कॉटलंड
उंची १.८८ मी (६ फु २ इं)
सुरुवात २००५
शैली उजव्या हाताने; दोनहाती बॅकहँड
बक्षिस मिळकत US $२०,९२६,७५२
एकेरी
प्रदर्शन ४१३ - १२८
अजिंक्यपदे ३८
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (१७ ऑगस्ट २००९)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (२०१०, २०११, २०१३, २०१५, २०१६)
फ्रेंच ओपन उपविजयी (२०१६)
विंबल्डन विजयी (२०१३, २०१६)
यू.एस. ओपन विजयी (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन ४५ - ५३
शेवटचा बदल: जुलै २०१६.


ऑलिंपिक पदक माहिती
युनायटेड किंग्डमयुनायटेड किंग्डम या देशासाठी खेळतांंना
पुरूष टेनिस
सुवर्ण २०१२ लंडन एकेरी
रौप्य २०१२ लंडन मिश्र दुहेरी
सुवर्ण २०१६ रियो दि जानेरो एकेरी

अँड्र्यू अँडी मरे ( मे १५, इ.स. १९८७, ग्लासगो, स्कॉटलॅंड) हा एक ब्रिटिश टेनिस खेळाडू आहे. तो ब्रिटनमधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू असून सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर ८ एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकल्या असून ३ वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे. एकाच वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठणारा खुल्या जगतातील केवळ सातवा टेनिस खेळाडू तर विंबल्डनची अंतिम फेरी गाठणारा एकमेव ब्रिटिश खेळाडू आहे. २०१२ यू.एस. ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून मरे ७६ वर्षांमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा पहिलाच ब्रिटिश टेनिस खेळाडू ठरला. ह्यापूर्वी फ्रेड पेरी ह्याने १९३६ साली यू.एस. ओपन स्पर्धा जिंकली होती. ह्यापूर्वी चार ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभव पत्कारणाऱ्या मरेला पाचव्या वेळेस मात्र स्पर्धा जिंकण्यात यश मिळाले. २०१३ विंबल्डन स्पर्धा जिंकून मरे ७७ वर्षांनंतर हा मान मिळवणारा पहिला ब्रिटिश टेनिस खेळाडू बनला.

२०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत मरेने रॉजर फेडररला हरवून पुरूष एकेरीमध्ये सुवर्णपदक तर मिश्र दुहेरीमध्ये रौप्य पदक पटकावले. त्याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुन्हा पुरुष एकेरीचे सुवर्णपदक मिळवले.

कारकीर्द

[संपादन]

ग्रँड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या: ११ (३ - ८)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २००८ यू.एस. ओपन हार्ड स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 2–6, 5–7, 2–6
उपविजयी २०१० ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 3–6, 4–6, 6–7(11–13)
उपविजयी २०११ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 4–6, 2–6, 3–6
उपविजयी २०१२ विंबल्डन स्पर्धा ग्रास स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–4, 5–7, 3–6, 4–6
विजयी २०१२ यू.एस. ओपन हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 7-6 (12-10), 7-5, 2-6, 3-6, 6-2
उपविजयी २०१३ ऑस्ट्रेलियन ओपन (3) हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–7(2–7), 7–6(7–3), 6–3, 6–2
विजयी २०१३ विंबल्डन ग्रास सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–4, 7–5, 6–4
उपविजयी २०१५ ऑस्ट्रेलियन ओपन (4) हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–7(5–7), 7–6(7–4), 3–6, 0–6
उपविजयी २०१६ ऑस्ट्रेलियन ओपन (5) हार्ड सर्बिया नोव्हाक जोकोविच 1–6, 5–7, 6–7(3–7)
उपविजयी २०१६ फ्रेंच ओपन क्ले सर्बिया नोव्हाक जोकोविच 6–3, 1–6, 2–6, 4–6
विजयी २०१६ विंबल्डन (2) ग्रास कॅनडा मिलोस राओनिच 6–4, 7–6(7–3), 7–6(7–2)

ऑलिंपिक स्पर्धा

[संपादन]

एकेरी: 1 (1–0)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१२ युनायटेड किंग्डम लंडन ग्रास स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 6–2, 6–1, 6–4

मिश्र दुहेरी: 1 (0–1)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार सहकारी प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१२ युनायटेड किंग्डम लंडन ग्रास युनायटेड किंग्डम लॉरा रॉब्सन बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
बेलारूस मॅक्स मिर्न्यी
6–2, 3–6, [8–10]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत