हाफिज सईद
Appearance
हाफिज मुहम्मद सईद | |
---|---|
जन्म |
मार्च १०, १९५० सरगोधा, पाकिस्तान |
मृत्यू |
12 सप्टेंबर 2020 |
राष्ट्रीयत्व | पाकिस्तानी |
ख्याती | कुप्रसिद्ध दहशतवादी |
धर्म | मुस्लिम |
हाफिज मुहम्मद सईद ( १० मार्च, इ.स. १९५० - हयात ) हा मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार व प्रमुख आरोपी आहे. जमात-उद-दवा व लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचा तो संस्थापक प्रमुख आहे.[१][२] सईद याला पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने सबळ पुराव्याअभावी सोडून दिले असले तरी त्याला कटकारस्थान व भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या आरोपात भारतीय ट्रायल कोर्टाने दोषी धरले आहे.[३]
इनाम
[संपादन]हाफिज सईद याला पकडणाऱ्या किंवा त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणाऱ्या व्यक्तीला अमेरिका सरकारने तब्बल १ कोटी अमेरिकी डॉलरचे इनाम १ एप्रिल २०१२ रोजी घोषित केले आहे.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ पाक अतिरेक्याच्या साथीदाराला अटक[permanent dead link] म्.टा
- ^ धरले तर चावते...[permanent dead link] म्. टा
- ^ ठोस पुरावेच सादर न झाल्याने सईद मुक्त![permanent dead link] म्.टा
- ^ हाफिज सईदबाबतच्या या निर्णयाचे भारताकडून स्वागत Archived 2012-04-06 at the Wayback Machine. सकाळ