Jump to content

कोविड-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९)
इतर नावे
  • कोरोनाव्हायरस
  • नॉव्हेल कोरोनाव्हायरस न्युमोनिया
  • कोविड
  • कोविड१९
COVID-19 symptoms
पेशी संसर्गजन्य रोग
लक्षणे ताप, खोकला, श्वास लागणे अथवा काहिही नसणे.
गुंतागुंत न्युमोनिया,
सामान्य प्रारंभ २ ते १४ दिवस
निदान पद्धत
  • रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमेरेज चेन रिएक्शन (rRT-PCR)
प्रतिबंध प्रवास टाळणे, वारंवार साबणाने व्यवस्थित हात धुणे, इतरांशी शारीरिक अंतर राखणे
वारंवारता
  • १३,५८,६९,७०४[] पेक्षा जास्त लोक संक्रमीत.
मृत्यू
  • २९,३५,२७१[] पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
  • कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९) हा एक अति संसर्गजन्य रोग आहे जो गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम-संबंधित कोरोनाव्हायरस २ अथवा (एसएआरएस-कोव्ह-२) (SARS-CoV-2) या नावाच्या नवीन विषाणूद्वारे होतो. ज्या सार्स (SARS-CoV-1) या रोगाने आग्नेय आशियामधे थैमान घातले होते. त्या कोरोनाव्हायरस विषाणूच्या प्रजातीतील पण पूर्णपणे नवीन असा हा विषाणू आहे.[]

    डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये या नवीन आजाराची पहिली ओळख करण्यात आली होती. (तेथेच हा रोग कृत्रिमपणे तयार करण्यात आला.) आणि त्यानंतर जागतिक स्तरावर या आजाराचा प्रसार झाला व त्याने जागतिक महामारीचे रूप घेतले.[] या आजाराच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला आणि श्वास लागणे यांचा समावेश आहे, तर इतर लक्षणांमध्ये थकवा, स्नायू दुखणे, अतिसार, घसा खवखवणे, गंध कमी होणे आणि पोटदुखी या लक्षणांचा समावेश असू शकतो. सामान्यत: लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्यापर्यंतचा कालावधी हा दोन ते चौदा दिवसांचा असू शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात, तर काही रोग्यांमधे व्हायरल न्युमोनिया आणि बहु-अवयव निकामी होण्याची भीती असते. 12 April 2021[] पर्यंत जगातील १८५ देशातील १३,५८,६९,७०४[] पेक्षा जास्त लोकांना हा रोग झाला असल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परिणामी २९,३५,२७१[] पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. ७,७२,८४,५६६[] पेक्षा जास्त लोक बरेही झाले आहेत. एकूण संसर्ग झालेल्या रोग्यांपैकी 2%[] लोकांचा मृत्यू झाला आहे.

    महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेकातील पहिल्या रुग्णाची नोंद ९ मार्च २०२० रोजी पुण्यात झाली.[]

    हा विषाणू प्रामुख्याने जवळच्या संपर्कादरम्यान खोकल्यामुळे, शिंकण्यामुळे किंवा बोलताना नकळत बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या तुषारांमुळे लोकांमध्ये पसरतो. हे थेंब अथवा तुषार श्वासोच्छवासाच्या दरम्यानदेखील बाहेर पडून आजूबाजूच्या जमिनीवर किंवा पृष्ठभागांवर पडतात व अशा दूषित पृष्ठभागाला हाताने स्पर्श करून आणि नंतर तोच त्यांच्या चेहऱ्याला लावल्यानेही लोक संक्रमित होऊ शकतात.[] हे विषाणू ७२ तासांपर्यत या दूषित पृष्ठभागांवर जिवंत राहू शकतात.[] लक्षणे दिल्यानंतरच्या पहिल्या तीन दिवसांत हा विषाणू सर्वात जास्त संक्रामक असतो, परंतु रोगाची लक्षणे दिसण्यापूर्वी देखिल आणि रोगाच्या नंतरच्या टप्प्यात देखील फार संक्रामक आसतो.[] या रोगाच्या निदानाची मानक पद्धत म्हणजे नाकातून घेतलेल्या नमुन्यांची रीअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन (आरआरटी-पीसीआर) (rRT-PCR) नावाची तपासणी होय.[]

    वारंवार साबणाने व्यवस्थित हात धुणे, इतरांशी शारीरिक अंतर राखणे (विशेषतः लक्षणे असणाऱ्या लोकांकडून), खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे. अचानक शिंक आली असताना व रुमाल जवळ नसल्यास कोपर तोंडावर धरून हाताच्या आतल्या बाजूला शिकणे, न धुतलेले हात चेहऱ्यापासून दूर ठेवणे या व अशा उपायांचा वापर केल्यास विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते.[]

    ज्यांना विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे अथवा सौम्य लक्षणे दिसत आहेत अशांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्या अथवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वानी मास्क वापरण्याची शिफारस केली जाते.[१०] सध्या, कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९) वर जगात कोणतीही लस किंवा विशिष्ट उपचार नाहीत. फक्त रोग्याच्या लक्षणांवर आधारीत उपचार, प्रतिकार शक्ती वाढविण्याचे उपाय, विलगीकरण व काही प्रयोगात्मक उपाय या गोष्टींचा उपचार म्हणून वापर केला जातो.[११]

    जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९)चा उद्रेक हा सार्वजनिक आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे सांगत या उद्रेकाला जागतिक महामारी जाहीर केले.

    टेड्राॅस ॲडमहॅनोम गेब्रेयेसोस यांनी Covid-19 नाव घोषित केले. इंटरनॅशनल कमिटी ऑफ टॅक्सोनाॅमी ऑफ व्हायरस यांनी SARS-Cov-2 हे नाव दिले

    कोरोनाचे ४ प्रकार :

    1. 229E अल्फा कोरोनाव्हायरस
    2. NL63 अल्फा कोरोनाव्हारस
    3. OC43 बीटा कोरोनाव्हायरस
    4. HKU बीटा कोरोनाव्हायरस

    लक्षणे

    [संपादन]

    कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९) विषाणूचा संसर्ग झालेल्यांना ताप, खोकला, थकवा आणि श्वास लागणे अशी फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. श्वास घेण्यात अडचण, सतत छातीत दुखणे किंवा छातीवर दबाव असल्यासारखे वाटणे, गोंधळून जाणे, जागे होण्यास अडचण येणे आणि चेहरा किंवा ओठ निळे होणे या सारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचारांचा सल्ला दिला जातो. शिंका येणे, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे अथावा मळमळ, उलट्या किंवा अतिसार ही लक्षणे फार कमी रुग्णांमधे दिसून आली आहेत.

    कारणे

    [संपादन]

    प्रसार

    [संपादन]

    हा रोग कसा पसरतो याबद्दलचे काही तपशील निश्चित केले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आणि अमेरीकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) या संथांच्या म्हणण्यानुसार, हे विषाणू मुख्यत: दोन व्यक्तींच्या जवळच्या संपर्काच्या वेळी तसेच खोकला, शिंका येणे किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या थेंबाद्वारे पसरतात. जवळचा संपर्क म्हणजे १ मीटर अथवा ३ फूट समजले जाते. सिंगापूरमधील एका संशोधनात असे आढळले आहे की, खोकताना किंवा शिंगताना रुमालाचा वापर न केल्यास किंवा मास्कचा वापर न केल्यास कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९) विषाणू हवेतून १५ फुटापर्यत लांब पसरु शकत्तात. हे विषाणू जवळच्या लोकांच्या तोंडात किंवा नाकात शिरतात आणि श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांमध्ये पोहचतात. प्रारंभिक अभ्यासानुसार कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९) विषाणूच्या संक्रमित व्यक्तींची संख्या ही दर ६ ते ७ दिवसांची दुप्पट होते आणि याचे मूलभूत पुनरुत्पादन प्रमाण (R0) हे २.२ – २.७ असल्याचे मानले जात होते, परंतु ७ एप्रिल २०२० रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार वुहानमधील साथीच्या सुरुवातीच्या काळात संक्रमित व्यक्तींची संख्या ही दर २.२ ते ३.३ दिवसांनी दुप्पट झाली होती.

    जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर त्याच हाताने डोळ्यावर, नाकात किंवा तोंडाला स्पर्श करते तेव्हा अशा कृतीने ती व्यक्ती संक्रमित होते त्यास फोमेट ट्रान्समिशन म्हणून ओळखले जाते. संक्रमित व्यक्तीच्या मलमूत्रातून विषाणूचे संक्रमण पसरते अशी चिंता व्यक्त केली जात असली तरी हा धोका कमी असल्याचे ही मानले जाते.

    लक्षणे दिसू लागताना हा विषाणू सर्वात जास्त संक्रामक असतो परंतु लक्षणे दिसत नसतानाही व ती उद्भवण्याआधी ही एखाद्या व्यक्तीद्वारा विषाणू पसरवला जाण्याची शक्यता आहे, परंतु अशी जोखीम कमी असल्याचे मानले जाते. युरोपीयन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन एंड कंट्रोल (ईसीडीसी) या संस्थेच्या म्हणण्यानुसार हा रोग किती सहजतेने पसरतो हे पूर्णपणे स्पष्ट नसले तरी एक व्यक्ती साधारणपणे दोन ते तीन इतर व्यक्तींना संक्रमित करते.

    विषाणुशास्त्र

    [संपादन]

    सीव्हियर ॲक्याुट रेस्पेरेट्री सिंड्रोम कोरोनाव्हायरस २ (SARS-CoV-2) हा एक व्हायरसचा वाण आहे ज्यामुळे कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९) हा श्वसन रोग होतो. याला बोली भाषेत कोरोनाव्हायरस म्हणून ओळखले जाते. सुरुवातीच्या काळात याला नॉव्हेल कोरोनाव्हायरस (२०१९-एनसीओव्ही) हे तात्पुरते नाव दिले होते. जनुकीय विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की कोरोनाव्हायरस हा विषाणू बीटाकोरोनॅव्हायरस ह्या विषाणूंच्या प्रजातीमधील आहे. बीटाकोरोनॅव्हायरस ह्या प्रजातीतील इतर विषाणू म्हणजे सार्स व मार्स होय.

    विकृतिविज्ञान

    [संपादन]

    कोविड १९ या रोगात विषाणू फुफ्फुसातील टाइप २ अल्व्होलर नावाच्या पेशींमध्ये जास्त प्रमाणात असणाऱ्या अँजिओटेन्सीन नावाच्या एंझाईम (ACE2)द्वारे फुफ्फुसांच्या पेशींवर हल्ला करतो. त्याच प्रमाणे तो जठरातील, लहान आतड्यातील व मलाशयातील ग्रंथीच्या पेशीत असणाऱ्या अँजिओटेन्सीन एंझाईमद्वारे या अवयवांवर हल्ला करून या अवयवांचे देखील नुकसान करतो. या विषाणूमुळे रक्तवाहन यंत्रणेचे तीव्र नुकसान होते तसेच हृदयाघात होण्याची शक्यता असते. चीनच्या वुहानमधील रुग्णालयात दाखल झालेल्या १२% संक्रमित लोकांमध्ये तीव्र ह्रदयाची दुखापत झाल्याचे माहिती आहे. हृदयाघात होण्यामागील मुख्य कारण रोगप्रतिकारक यंत्रणे वर आलेला तणाव किंवा अँजिओटेन्सीन नावाचे एंझाईम असू शकते. अतिदक्षता विभागात भरती असलेल्या ३१% रुग्णांमधे रक्त रक्तवाहिनीच्या आत रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचे प्रमाण आठळते.

    निदान

    [संपादन]

    १७ जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनाने सार्स-सीओव्ही -2 साठी अनेक आरएनए चाचणीचे मानदंड प्रकाशित केले व रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन (rRT-PCR) ही चाचणी कोरोना लागण झाल्याचे पुष्टीकरण करण्यासाठी प्रमाणित केली.[१२] ही चाचणी विशेषतः नाकातुन घेतलेल्या नमुन्यांची अथवा घशातून घेतलेल्या थुंकीच्या नमुन्यांवर केली जाते. चिनच्या शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरसच्या नमुन्याच्या विश्लेषणाअंती ह्या विषाणुचे जनुकीय गुणसुत्र मिळवण्यात यश मिळाले. जगभरातील संशोधकांना स्वतःचे रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन (rRT-PCR) ह्या चाचणी साठीचे टेस्ट किट बनवण्यासाठी मदत होइल या उद्देशाने ते संशोधन चिनच्या शास्त्रज्ञांनी जाहीर प्रकाशित केले.[१३][१४] ७ एप्रिल २०२० रोजी भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने एचएलएल लाइफकेयर लिमिटेड या सरकारी कंपनीने विकसित केलेले रॅपिड अँटिबॉडी ब्लड टेस्ट किटला प्राथमिक चाचणी म्हणून मान्यता दिली. १५ ते २० मिनिटांत होणाऱ्या या चाचणीच्या मदतीने कोरोना प्रादुर्भाव कोणत्या भागात वाढत आहे याचा आभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या रॅपिड अँटिबॉडी ब्लड टेस्टची अचूकता केवळ ६० ते ७०% आहे आसा चीन मधिल अनुभव आहे.[१५] अँटीबॉडी रक्त चाचणीत रुग्ण संक्रमित असल्याचे अढळल्यास त्या रुग्णांची जागतिक आरोग्य संघटनाने प्रमाणित केलेली rRT-PCR चाचणी होणार आहे.[१६]

    प्रतिबंध

    [संपादन]

    रोगाचा प्रसार रोखण्यासाठीचे धोरण म्हणून वारंवार साबणाने व्यवस्थित(कमीतकमी २० सेकंद) हात धुणे, इतरांशी शारीरिक अंतर राखणे (विशेषतः लक्षणे असणाऱ्या लोकांकडून), खोकताना किंवा शिंगताना रुमालाचा वापर करणे. अचानक शिंक आली असताना व रुमाल जवळ नसल्यास कोपऱ्याने हाताची घडी घालून खाकेच्या दिशेने आतील बाजूस शिंकणे. न धुतलेले हात चेहऱ्यापासून दूर ठेवणे या उपायांचा वापर केल्यास विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते.[१७][१८]

    सामाजिक शारीरिक अंतर हा कोरोनाव्हायरस सारख्या अति संक्रामक रोगाचा प्रसार रोखण्याच्या उपायांपैकी सर्वात महत्त्वाचा विषय आहे. निदान न झालेल्या पण संक्रमित असलेल्या अशा व्यक्तींच्या मार्फत समाजात होणारे संभाव्य संक्रमण रोखण्यासाठी या उपायाचा फार फायदा होतो. शाळा आणि कामाची ठिकाणे बंद करून, प्रवासावर प्रतिबंध घालून आणि सार्वजनिक मेळावे रद्द करून संभाव्य संक्रमित व्यक्तींचा इतरांशी संपर्क कमी करण्यामागचा उद्देश असतो. दोन व्यक्तींमधील अंतराच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे कमीतकमी ६ फूट (१.८ मीटर) अंतर राखणे आवश्यक आहे.[१९] बऱ्याच देशांनी शिफारस केली आहे की निरोगी व्यक्तींनी देखील जनतेत जाताना मास्क किंवा स्कार्फचा वापर करावा.[२०]

    हा विषाणू एखाद्या पृष्ठभागावर काही तासांपासून काही दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. विशेषतः कागदी पुठ्यावर एका दिवसासाठी, प्लास्टिक (पॉलीप्रॉपिलिन) तसेच स्टेनलेस स्टील (एआयएसआय ३०४) वर तीन दिवस आणि शुद्ध तांब्याच्या वस्तुंवर चार तासांपर्यंत राहु शकतो परंतु हा काळ आर्द्रता आणि तापमानानुसार बदलतो.[२१]

    या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्यासाठी ७८ ते ९५ % शुद्ध इथेनॉल, ७० ते १०० % प्रोपेनॉल २ (आयसोप्रोपिल अल्कोहोल), १-प्रोपेनॉल ३० % व २-प्रोपेनॉलचे 45% याचे मिश्रण, ०.२१ % सोडियम हायपोक्लोराइट (ब्लीच), ०.५ % हायड्रोजन पेरोक्साइड, ०.२३ -७.५ % पोविडोन-आयोडीन या विविध रसयनांचा वापर करता येऊ शकतो. योग्य प्रकारे वापरल्यास साबण आणि डिटर्जंट देखील प्रभावी आहेत. साबणाने व्हायरसच्या फॅटी प्रोटेक्टिव्ह लेयरची विटंबना होते, त्यामुळे विषाणू निष्क्रिय होतात. बेंझलकोनिअम क्लोराईड आणि क्लोरहेक्साइडिन ग्लुकोनेट यासारखी सर्जिकल जंतुनाशके ही कमी प्रभावी आहेत.[२२]

    या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील नियम व संकेतांचे पालन करा.

    1. सर्वात महत्त्वाचे,Prevention is better than cure.अर्थात फिजिकल डिस्टन्स पाळा.
      • तोच सर्वात प्रभावी मार्ग आहे हे आतातरी समजून घ्या.
    2. प्रत्येक वेळी हात sanitiser ने किंवा साबणाने स्वच्छ धुवा.खूप अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा.
      • बाहेरून आल्यावर अवश्य आंघोळ करा.
    3. शक्यतो बाहेरचे पदार्थ आणू नका.
      • भाजीपाला आणला तर तो मीठ टाकून किमान २-३ वेळा धुऊन वापरा.
    4. जिल्ह्याच्या सर्व सीमा कडकपणे सील करा.
    5. कुणी त्यात अडथळा आणत असेल तर प्रशासनाला कळवा. प्रशासनाने परवानगी घेऊनही कुणी सीमेच्या आत येत असेल किंवा बाहेर जात असेल तर त्याची सर्वप्रथम कोरोना टेस्ट करूनच पुढे जाऊ द्यावे.त्यासाठी जमल्यास सीमेवरच तपासणी करता येईल का? त्यासाठी प्रयत्न करावेत.
    6. प्रशासन रुग्णांची माहिती देते.त्यामुळे वृत्तपत्रे,वाहिन्या, त्यांचे प्रतिनिधी वगळता इतरांनी माहिती देऊ नका.त्यामुळे वातावरण अजून तंग होते.
    7. आपल्या घरात ह्या विषयावर अजिबात चर्चा करु नका.अशी संकटे खूप येतात आणि नक्कीच जातात अशीच चर्चा ठेवा.
    8. शक्य असेल तर किराणा, गरजेचीऔषधी जास्त प्रमाणात आणून ठेवा. पेट्रोल एकदाच भरा.
      • आपले घर आणि परिसरात रोज सफाई करा. कचरा रोज जाळा.
    9. आपल्या नगरात नियमीत फवारणी करण्याचा आग्रह धरा.
    10. प्रशासनाने योग्य नियोजन करून आणि विक्रेत्यांना संपर्क करून प्रमाणित विक्री प्रतिनिधिमार्फत प्रत्येक नगरात किराणा, भाजीपाला, औषधी, बेकरी सामान, दूध आदी अत्यावश्यक सेवा पैसे घेऊन पुरवल्या तर बाहेरची मोठी गर्दी टळेल.
    11. असंख्य नागरिक सर्व नियम पाळत असताना अनेक हौसे रोडवर हुल्लडबाजी करीत आहेत. दोनपेक्षा अधिकजण दुचाकीवर असले की त्वरित कारवाई करा. संध्याकाळ झाली की असंख्य व्यक्ती एकत्र येऊन डिस्टन्स न पाळता जमाव करून गप्पा मारीत आहेत. तसे करू नका.
    12. सर्वात महत्त्वाचे : आरोग्य विभागाला पूर्ण संरक्षण देऊन आता तरी घरोघर तपासणी करा.
      • हे खूप गरजेचे आहे.त्यातून रुग्ण सर्व्हे होईल आणि असल्यास रुग्ण सापडतील.
    13. नियम पाळा आणि संकट टाळा!
    14. कोरोना* रोग लवकर नष्ट होईल असे वाटत नाही, तथापि आपल्याला काम हे *करावेच* लागणार आहे .
    15. दैनंदिन जीवनामध्ये आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे *काळजी* घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे .
    16. जितका वेळ शक्य असेल तितका वेळ सार्वजनिक शौचालये वापरू नयेत.
    17. आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या चपला बूट बाहेर काढण्यास सांगावे .
    18. ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यास सांगावे .
    19. चलनी नोटा न हाताळता आपल्याला येणे असलेली रक्कम चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी .
    20. आपले मित्र, तसेच नातेवाईक व सहकारी यांचे दरम्यान ४ फूट अंतर कायमस्वरूपी राखावे .
    21. काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे व हातपाय धुवावे, कपडे धुण्यास टाकावे वा स्वतः धुवावेत.
    22. कोणाशीही भेट घेऊ नका व कोणालाही भेटू नका.
    23. अगदी जवळच्या कुटुंबाचीही भेट घेऊ नका.
    24. अगदी बाजूच्या शेजाऱ्याचीही भेट घेऊ नका.
    25. बिल्डिंगच्या कॉमन गॅलरीत मध्ये सहज देखील जमा होऊ नका.
    26. बिना मास्क कॉमन गॅलरीत येऊ नका.
    27. बिल्डिंगची कॉमन मीटिंग आयोजित करू नका.
    28. कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये .
    29. अगदी गरजेच्या वेळेस ऑफिसमध्ये अथवा पार्किंग मध्ये उपस्थित राहून भेटावे
    30. अनेक क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये फक्त *स्वतःचाच* मोबाईल फोन वापरावा .
    31. आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने *मास्क* घातला नसेल तर त्याच्याशी संभाषण करण्यास *स्पष्ट* नकार द्यावा .
    32. अनेक वेळा गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे, रस्त्यावर थुंकू अगर पिंचकारी मारू नका .
    33. अगदी बिल्डिंगमधील गॅलरी व जिने पाण्याने धुण्यासाठीही एकत्र येऊ नका, ( सध्या बिल्डिंगची गॅलरी व जिने पाण्याने धुण्याचे फ्याड कित्येकदा जनजागृती करूनही काही बिल्डिंगमध्ये अजूनही पाहायला मिळते. आपल्या कुटुंबीयांना विशेषतः महिला वर्गाला सतर्क करा की पाण्याने गॅलरी व जिने धुऊन कोरोना जाणार नाही, उलट तो तुमच्या घरात तुमच्या ओल्या पायाने, ओल्या हाताने, वापरलेल्या झाडूतून, बिल्डिंगमध्ये जिने धूत असताना जो लोकसंपर्क आला त्यातून प्रवेश करतो.) कारण आपला शेजारीच जर उद्या कोरोना पेशंट निघाला तर त्याच्या संपर्कात आल्याने आपण आपला व आपल्या कुटुंबीयांचा जीव देखील धोक्यात घालत असतो.
    34. रस्त्यावरील खाद्यपदार्थ, कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावेत. घरातील भाजीपाला,फळे मिठाच्या पाण्यात १/२ तास भिजत ठेवावा
    35. जुनी कागदपत्रे हाताळताना हॅण्डग्लोव्हज वापरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
    36. परगांवावरून येणाऱ्या लोकांची मित्रांची सहकार्याची नातेवाईक यांची संपूर्ण माहिती फोनवरून घ्यावी व ते आले असतील तर अंतर ठेवावे .
    37. शासनाकडून गेले २महिने ज्या सूचना सुरू आहेत, जसे साबणाने हात धुणे, या सूचनांचा अंमल कायमपणे सुरू ठेवावा .
    38. *शेकहॅण्ड* पूर्णपणे टाळावेत व आपली परंपरागत नमस्काराची पद्धत अवलंब करावी

    व्यवस्थापन

    [संपादन]

    कोरोनाव्हायरस रोग २०१९ च्या रुग्णांच्या उपचाराचे व्यवस्थापन हे प्रामुख्याने लक्षणांवर आधारित असते यात ऑक्सिजन तसेच सलाईनचा वापर केला जाऊ शकतो.[२३] प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, निरोगी जीवनशैली आणि शरीराला आवश्यक पोषण प्रदान करणारे द्रवपदार्थ, विपुल पोषक द्रव्ये, सूक्ष्म पोषक घटक आणि पुरेसे कॅलरी असलेला आहार उपयोगी पडतो. संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सौम्य लक्षणे असणा-यांना सहाय्यक उपचार उपयोगी ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या लोकांची काळजी घेण्यासाठी काही शिफारसी प्रकाशित केल्या आहेत.

    औषध उपचार

    [संपादन]

    एप्रिल २०२० पर्यंतच्या माहिती प्रमाणे, कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड १९) साठीचे कोणताही विशिष्ट उपचार नाहीत.[२४] कोरोना व्हायरसला नष्ट करेल असे कोणतेही औषध किंवा त्या विषाणूपासून आपला बचाव होईल अशी कोणतीही लस अद्याप निघालेली नाही. भारतासह अनेक देशात लस तयार करण्यासाठीचे संशोधन जोरात सुरू आहे. गोवर, देवी, कावीळ अशा रोगांसाठीच्या लस तयार करण्यासाठी लागलेल्या वेळे पेक्षा फार कमी वेळ ह्या लसीच्या संशोधनासाठी लागेल असा शात्रज्ञांचा अंदाज आहे. २०२० च्या फेब्रुवारीच्या उत्तरार्धात, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की या विषाणूची लस तयार होण्यास कमीतकमी १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.[२५] ८ एप्रिल २०२० पर्यतच्या माहितीप्रमाणे जगात एकूण ११५ वेगवेगळ्या ठिकाणी अभूतपूर्व गतीने प्रयोग सुरू आहेत.[२६]

    भारतासह चीनमधे प्रभावीपणाच्या पुराव्याशिवाय पारंपरिक औषधांचा वापर व अवैज्ञानिक वैकल्पिक उपायांना काही लोक प्रोत्साहन देत आहेत.[२७]

    वैयक्तिक संरक्षणासाठीची उपकरणे

    [संपादन]

    कोरोनाव्हायरसच्या उपचारादरम्यान वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना संक्रमणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वैयक्तिक संरक्षणासाठीची उपकरणे फार जरुरीची असतात. २०२० च्या कोरोनाव्हायरस महामारीत जगात सर्वत्र वैद्यकीय वैयक्तिक संरक्षणासाठीचे साहित्य आणि इतर वस्तूंचा तुटवडा हा एक मोठा मुद्दा बनला. विषाणूपासून संरक्षण करणारा पोशाख, वैद्यकीय मास्क, हातमोजे इत्यादी साधनांचा तुटवडा आहे.[२८]

    व्हेंटिलेटर

    [संपादन]

    हे सुद्धा पहा

    [संपादन]

    महाराष्ट्रातील कोरोना रोगाची सांख्यिकी

    [संपादन]

    मुख्य पान: २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक

    संदर्भ

    [संपादन]
    1. ^ a b c d e f g "COVID-19 Dashboard by the Center for Systems Science and Engineering (CSSE) at Johns Hopkins University (JHU)". ArcGIS. Johns Hopkins University. 28 June 2020 रोजी पाहिले.
    2. ^ Perlman, Stanley. "Another Decade, Another Coronavirus". The New England Journal of Medicine. 382(8): 760–762. doi:2020 Feb 20 Check |doi= value (सहाय्य). PMID 31978944. 18 एप्रिल 2020 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)
    3. ^ Boseley, Sarah (January 30, 2020). "WHO declares coronavirus a global health emergency". द गार्डियन. March 30, 2020 रोजी पाहिले.
    4. ^ "देशातील 'या' सहा राज्यांत कोरोनाचे 65 टक्के रूग्ण; दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक प्रभाव". 17 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    5. ^ "Q&A on coronaviruses (COVID-19)". WHO. 17 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    6. ^ "New coronavirus stable for hours on surfaces". 17 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    7. ^ "Coronavirus disease 2019 (COVID-19) Situation Report – 73" (PDF). https://www.who.int. 17 एप्रिल 2020 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
    8. ^ Dey, Sushmi. "Vital test to cover all symptomatic cases in hotspots now". 11 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    9. ^ "कोरोनाची लागण : रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी". zee news. Mar 13, 2020.
    10. ^ "कोरोना व्हायरस : फैलाव रोखण्यासाठी सर्वांनीच चेहऱ्यावर मास्क बांधावेत?". BBC. 3 एप्रिल 2020. 17/04/2020 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
    11. ^ "काय आहे कोरोना व्हायरस? कशी घ्याल काळजी". लोकसत्ता.
    12. ^ Dey, Sushmi. "Vital test to cover all symptomatic cases in hotspots now". 11 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    13. ^ Cohen J, Normile D (January 2020). "New SARS-like virus in China triggers alarm" (PDF). Science. 367 (6475): 234–35. Bibcode:2020Sci...367..234C. doi:10.1126/science.367.6475.234. PMID 31949058. 11 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 11 February 2020 रोजी पाहिले.
    14. ^ "Severe acute respiratory syndrome coronavirus 2 data hub". NCBI. १६/०४/२०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 March 2020 रोजी पाहिले. |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
    15. ^ "How false negatives are complicating COVID-19 testing". 17 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    16. ^ "भारताच्या या कंपनीने तयार केल अँटिबॉडी किट". 2020-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 एप्रिल 2020 रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
    17. ^ Wiles S (9 March 2020). "The three phases of Covid-19—and how we can make it manageable". The Spinoff. 16 April 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 April 2020 रोजी पाहिले.
    18. ^ Barclay E (10 March 2020). "How canceled events and self-quarantines save lives, in one chart". Vox. 12 March 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 April 2020 रोजी पाहिले.
    19. ^ Maragakis, Lisa Lockerd. "Coronavirus, Social Distancing and Self Quarantine". www.hopkinsmedicine.org. Johns Hopkins University. 18 April 2020 रोजी पाहिले.
    20. ^ "Advice on the use of masks in the context of COVID-19". 18 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    21. ^ "Persistence of coronaviruses on inanimate surfaces and their inactivation with biocidal agents". The Journal of Hospital Infection. PMID 32035997. 18 एप्रिल 2020 रोजी पाहिले. |first1= missing |last1= (सहाय्य)
    22. ^ "Cleaning and Disinfection for Community Facilities". 18 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    23. ^ David Heymann, Dale Fisher,. "Q&A: The novel coronavirus outbreak causing COVID-19". National Center for Biotechnology Information, U.S. National Library of Medicine. 19 एप्रिल 2020 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)
    24. ^ "8 April 2020 Q&A on coronaviruses (COVID-19) 8 April 2020". WHO. 19 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    25. ^ Grenfell, Rob; Drew, Trevor (17 February 2020). "Here's Why It's Taking So Long to Develop a Vaccine for the New Coronavirus". ScienceAlert. |archive-url= requires |archive-date= (सहाय्य) रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 April 2020 रोजी पाहिले.
    26. ^ "The COVID-19 vaccine development landscape". 19 एप्रिल 2020 रोजी पाहिले.
    27. ^ YANAN WANG,, ANIRUDDHA GHOSAL. "Some people turn to herbal medicine for virus without proof". 19 एप्रिल 2020 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)
    28. ^ "डॉक्टरांनी घाबरु नये, पीपीई किटच्या पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू – उद्धव ठाकरे". 19 एप्रिल 2020 रोजी पाहिले.