नोएडा मेट्रो
Appearance
नोएडा मेट्रो | |||
---|---|---|---|
मालकी हक्क | नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन | ||
स्थान | नोएडा व ग्रेटर नोएडा, गौतम बुद्ध नगर जिल्हा, उत्तर प्रदेश | ||
वाहतूक प्रकार | जलद परिवहन | ||
मार्ग | १ | ||
मार्ग लांबी | २९.७ कि.मी. | ||
एकुण स्थानके | २१ | ||
सेवेस आरंभ | २५ जानेवारी २०१९ | ||
|
नोएडा मेट्रो ही भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामधील नोएडा व ग्रेटर नोएडा ह्या शहरांतील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. सध्या नोएडा मेट्रोची १ मार्गिका कार्यरत असून ती नोएडा सेक्टर ५१ मधील दिल्ली मेट्रोच्या निळ्या मार्गिकेपासून सुरू होते. सुमारे ३० किमी लांबीची व २१ स्थानके असणारी ही मार्गिका साधारणपणे नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्गाला समांतर धावते.
नोएडा मेट्रोचे उद्घाटन २५ जानेवारी २०१९ रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
बाहय् दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2019-08-19 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत