Jump to content

बलराज साहनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बलराज साहनी
दमयंती व बलराज
जन्म बलराज साहनी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

बलराज साहनी (मे १, १९१३ - एप्रिल १३, १९७३) हे बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबी भाषेत लिहिणारे लेखक होते.[]

जीवन

[संपादन]

बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता पाकिस्तान) या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर[] त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला.

पुढे १९३० साली ते पत्‍नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.[] महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.

'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.[]

बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-सहिर लुधियानवी फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार विक्रम गोखले यांना मिळाला.

अभिनय

[संपादन]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • पंजाबी नियतकालिक 'प्रीतलारी' मधून नियमित लेखन
  • मेरा पाकिस्तानी सफर
  • मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
  • मेरा रूसी सफरनामा

पटकथा

[संपादन]
  • बाजी (१९५१)

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ एनसायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ पंजाबी लिटरेचर. लेखकः आर.पी. मल्होत्रा, कुलदीप अरोरा. प्रकाशकः ग्लोबल व्हिजन पब्लिशिंग हाऊस, २००३. ISBN 81-87746-51-3. पृ. ४३४
  2. ^ http://www.tribuneindia.com/2001/20010902/spectrum/main2.htm
  3. ^ "संग्रहित प्रत". 2012-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-27 रोजी पाहिले.
  4. ^ http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006

बाह्य दुवे

[संपादन]